गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच निधन झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून पर्रीकर आजारी होते. गोव्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सकाळपासुनच पर्रीकर यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरविल्या जात होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रर्दशन करूनदेखील डॉक्टरांना यश आले नाही. अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
मनोहर पर्रीकर यांना स्वादूपिंडाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. उपचारासाठी पर्रीकर काही दिवस अमेरिकेत जाऊन उपचार घेऊनसुध्दा आले होते. मनोहर पर्रीकर यांना झोपूनच रहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. शनिवारी सकाळच्यापेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती सुधारली पण स्थिती चिंताजनक होती. गेल्या, कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली. दरम्यान, पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.